प्राचार्य डॉ.मंजुषा देशमुख. राज्यातल्या अभियांत्रिकी क्षेत्रात असलेलं अभ्यासू नाव. अभ्यासू संशोधक, अनेक प्रयोग करणाऱ्या प्राचार्य. नव्या बदलासह, अभियांत्रिकी क्षेत्रात नव्याने प्रयोग करू इच्छिणाऱ्या त्या तमाम युवकांच्या आयडॉल. अभियांत्रिकी क्षेत्र कसे बदल घेऊ पाहतोय, नव्याने कुठले बदल होतात, गावकुसातुन शहरात येणारा मुलगा जो धडपड करत उभे राहू पाहतो, तेव्हा त्यांना कुठल्या अडचणी येतात, या सगळया समस्येवर एक प्राचार्य म्हणून एका महिलेला किती आव्हान स्वीकारावे लागतात. एका गरीब, सर्वसामान्य कष्टकऱ्यांची मुलगी ते मुंबईतल्या सरस्वती कॉलेजसारख्या सर्व परिचित असणाऱ्या कॉलेजच्या प्राचार्य. असा सगळा प्रवास 'सक्सेस पासवर्ड' या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राचार्य मंजुषा देशमुख यांनी सर्वांसमोर ठेवला आहे. सकाळचे संपादक संदीप काळे यांनी 'सक्सेस पासवर्ड' या शोच्या माध्यमातून मंजुषा देशमुख यांना बोलते केले आहे. चला तर मग सहभागी होऊया 'सक्सेस पासवर्ड विथ संदीप काळे' मध्ये.